आज अचानक पुण्याची दरारून आठवण येतेय . सध्या उन्हाळा सुरु झाला असेल ..सगळी लोक ह्या वर्षीचा उन्हाळा किती जास्त आहे मागच्या उन्हाळ्या पेक्षा हे discuss करत असणार . लवकरच होणारी आंब्यांची सुरुवात..शहळ्या च पाणी ..सगळ्यांच्या घरी पन्हे , आंबील .. किती छान ..तापत्या उन्हा नंतर येणारी तांबडी संध्याकाळ.. पेप्सीकोले .. बर्फाचे गोळे .. कोकणातल्या ट्रीप . . .. उन्हाळा सुरु झाला कि tv वर येणाऱ्या ice creame च्या जाहिराती ..वाडीलाल .. वाल्स ..रसना :) चैत्रा च हळदी कुंकू.. आंबे डाळ .. उन्हाळ्याची सुट्टी ..वेग वेगळ्या flavours ची सरबत ..
कि म येणार आंबे... माझा हापूस .. मग मात्र चंगळ च चंगळ.. ..
आई सगळी उन्हाळ्याची काम काढायची....साबुदाण्याचे पापड, बटाटा चिप्स .बटाट्याचा कीस ..लोणची.. मूग वडे, सांडगे .. आणि काय काय .अजूनही करते च थोडा फार ..
आई सगळी उन्हाळ्याची काम काढायची....साबुदाण्याचे पापड, बटाटा चिप्स .बटाट्याचा कीस ..लोणची.. मूग वडे, सांडगे .. आणि काय काय .अजूनही करते च थोडा फार ..
हळू हळू ह्या सगळ्या गोष्टी आमच्या generation मध्ये च गायब होणार . .
आपल्या कडच्या प्रत्येक ऋतू वर लिहायला सांगितला तर ..किती वेगवेगळ्या गोष्टी मनात येतील..
पुलावर..कट्ट्यावर च भेटणं .. मटकी भेळ.. पाणी पुरी ..हल्ली मी ऐकलं मुंबईत ठाण्यात एका ठिकाणी बिसलेरी water वापरून केलेलं पाणी ..त्याची पाणी पुरी असते ..सही आहे..:)
इंग्लंड मध्ये राहिल्यावर सर्वात पहिली गोष्ट जिचं महत्व पटत ..ती म्हणजे उन . :) सध्या इकडे हि हळू हळू उन्हाळा सुरु होतोय.. उन्ह पहिला कि कोण आनंद होतो... आणि इकडे पावसाचा मस्त आवाज येत नाही...
काल इकडे एका south इंडिअन restaurent मध्ये गेलो होतो... सगळा काही आपल्या सारखाच असता taste wise ..पण तरीही आम्हाला व्याडेश्वर (F .C .रोड )मध्ये च खावंसं वाटलं :)
ह्याला च कूप मंडूक म्हणतात का? कि मातीची ओढ म्हणतात ?
A man travels whole world in search of something and returns home to find it :)
Discovery वर वाचला होत ..author आठवत नाही .
तुमच्या करता उन्हाळा म्हंटल कि काय आठवत ..
काय काय मनात येत ते आज च लिहा ..diary त ...
सगळ्या मंडळींनी घरातल्या... आजी आजोबा आई बाबा ..
आणि आपापल्या आठवणी आपल्या मुलांना आणि
सर्वांना सांगा ..
मला हि पाठवायला विसरू नका
4 comments:
Prachi khoooop chan lihile aahes...agadi manatal...
khoopch sundar lihalle aahes..too good
Hey!! First time on your blog.
Khup chan aahet saglya recipes.
Ani hey article tar superb aahe.
Thank you Manisha, Manasi, Chakhlere :-)
Post a Comment