Tuesday, October 14, 2008

दाक्षिणात्य पद्धतीचा पुलाव - Pulao


साहित्य :

१ कप तांदुळ
३ ते ४ कांदे उभे बारीक़ चिरून घेतलेले
200 ग्राम पत्ता गोबी उभी बारीक़ चिरून
७ ते ८ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार घेणे
५ ते ६ पाकळ्या लसुण
मूठ भर मावेल इतपत पुदीना
कोथिम्बिर
अध्रक किसुन घेतलेला
दालचीनी १ काड़ी
४ ते ५ लवंगा
२ मोठे चमचे खोवलेल नारळ
1 मोठा बटाटा उभा बारीक़ चिरून . finger चिप्स जसे असतात तसा
१ वाटी मटार
१०० ग्राम श्रावण घेवडा
१०० ग्राम गाजर उभा चिरून
चवीनुसार मीठ
पाणी
३ ते ४ मोठे चमच तेल
जीर फोडणी करता

कृती:

कुकर मधेच डायरेक्ट करुयात.
तांदुळ धुवून घेउन पाणी काढून भांड्यात १० मिनिटे ठेवा। तो पर्यन्त मसाला बनवुन घेउयात.
ओला मसाला तयार करण्या करीता : १ कांदा बारीक़ चिरून घेउन तो लसुण , हिरव्या मिरच्या, दालचीनी, पुदीना,अध्रक,लवंगा,खोवलेल खोबर, किंचित कोमट पाणी असा सगळ मिळुन मिक्सर मधून वाटुन घ्या
कुकर मधे तेल गरम करायला ठेवा.तेल चांगल गरम झाल की त्यात जीर,थोडीशी दालचीनी, लवंग घाला.
सर्वात प्रथम चिरलेला कांदा घाला ,कांदा अर्धा शिजत आला की पत्ता गोबी , गाजर, बटाटा ,बीन्स घाला.
सर्वात शेवटी मटार घाला.सीजन नसेल तर frozen मिळतात ते वापरले तरी छान लागतात.
आता धुतलेले तांदुळ घालून चांगल ढवळुन घ्या.
५ मिनिटे तसाच ढवळत राहिल्या नंतर , वाटलेला मसाला घाला.
१:२ ह्या प्रमाणा पणे पाणी घाला .
चवीनुसार मीठ घाला.
१ दा चांगला ढवळुन घेतल्यावर कुकर च झाकण बंद करून 3 शिट्ट्या होऊ दया.
गरम गरम असताना वरून बारीक़ चिरलेली कोथिम्बिर पेरून वाढा.

No comments: