Sunday, July 20, 2008

दही वडे

दही वडा :

साहित्य :
१ वाटी उडदाची दाळ
हिरव्या मिरच्या बारीक़ चिरलेल्या
अधरक बारीक़ किसलेला
तळण्या करता तेल
जीरे पुड
कोथिम्बिर ( optional) बारीक़ चिरलेली
पाणी
मीठ


कृती :

  1. उडदाची दाळ जवळ पास २ ते अडीच तास भिजत ठेवावी
  2. नंतर मिक्सर मधून वाटुन घ्यावी
  3. वाटलेली दाळ जास्त वेळ ठेवल्यास तेल जास्त ओढल्या जाते , म्हणुन जेव्ह्ना वडे करावयाचे असतील तेव्ह्नाच वाटुन घेणे उत्तम
  4. वाटल्या वर हाताने चांगले फेटून घेणे
  5. वडे तळून घ्यावेत
  6. लहान भांड्यात पाणी गरम करावयास ठेवावे
  7. पाणी कोमट झाले की त्यात मीठ घालावे व नंतर त्या पाण्यात वडे घालावेत
  8. १ ते २ मिनिटे ठेवावेत व नंतर हातात धरून पिळून काढावेत
  9. दही छान घुसळुन घ्यावे व त्यात १ -२ चिमुट साखर घालावी( दह्याचा आम्बट पणा बघून घालावी ) , किसलेला अद्रक आणि बारीक़ चिरलेली मिर्ची एकत्र वाटावी व दह्यात घालावी ( चावी प्रमाणे मिर्ची घालणे )
  10. दही परत चांगले मिसळुन घ्यावे व वाड्यानवर घालावे
  11. वरून जीरे पूड थोडेस तिखट अस हाताने घालावे
  12. घरी असल्यास चिंच गुळाचा सॉस ही घालावा
  13. हवी असल्यास कोथिम्बिर बारीक़ चिरलेली घालावी .
टिप :
  1. दही बनवताना मीठ घालू नए
  2. तळून झाल्या वर ज्या वेळेस वडे वाढायचे असतील त्या आधी कोमट पाण्यातून काढून घ्यावेत

1 comment:

Unknown said...
This comment has been removed by a blog administrator.