Showing posts with label मनातलं. Show all posts
Showing posts with label मनातलं. Show all posts

Tuesday, October 13, 2015

Pick Happiness or Unhappiness

एक दिवस भिजवलेले मूग निवडताना मनात एक विचार आला. आपण स्वयंपाक घरात अशी निवडीची काम करताना नेहमी चोर दाणे बाहेर काढतो, चांगले दाणे शोधत नाही; हसु आल का imagine करून :-)
अस करतो कारण तो common sense ahe....चोर दाणे कमी असतात म्हणून साहजिकच आपण ते निवडू... 
पण आयुष्यात  आपण नेहमी उलट करतो अस वाटतं.. 
चोर दाणे म्हणजे दुःख आणि चांगले दाणे म्हणजे उर्वरित aaushya अस बघितले तर तुम्ही काय कराल ?

हा हा

सगळी कड़े आपण 10 ways to seek happiness
100 ways to gain happiness
blah blah to live happy असच वाचत असतो , पण स्वयंपाक घरात जे  करतो ते केलं तर ?

म्हणजे चोर दाणे  शोधून आणि बाहेर काढ़ले तर?  :-)
दुःखा ची कारण शोधा आणि त्यांना  avoid  करा :-)

अमुक भावना ,अमुक विचार, अमुक व्यक्ति ( व्यक्ति ला टाळू नका - त्या व्यक्ति सोबत चे  भेद भाव किंवा गैर समज ) दूर करा - किमान प्रयत्न तरी..

सो जे काही उरेल ते असेल स्वछ आनंदी आयुष्य  :-)  आणि सुखाची १०० कारणं शोधण्या पेक्षा दुःखाची थोड़ी शी कारणं शोधणं सोप  ही आहे,....

यादि  करा आणि नव्या aushyachi नवी सुरुवात करा.. .सोपे नाहिये तेवढं... माहितीये 😊

पण याहून महत्वाचं म्हणजे  रोज  चा तोच तो पणा .. कधी कधी मनात उदासीनता आणू शकतो.. अश्या साठी ... कुठल्या गोष्टी आपल्याला आनंद देतात त्या बद्दल विचार करा... आणी जेंव्हा कधी असं वाटेल तेंव्हा अश्या आनंद देणऱ्या गोष्टी करायचा प्रयत्न करा. 

काही च नाही तर ... एखादं जुनं कपाट आवरायला घ्या ... मन नक्की लागेल. 

Sometimes avoiding triggers to unhappiness will help and many times doing things which make us happy willl help 😊💛

Just a Thought !

करून बघा :-) आणी जमलं तर सांगा कसा वाटला लेख.. 

प्राची

Thanks for reading :-)



Wednesday, September 23, 2015

Dont Take it for granted

काल पासून मनात विचारांच वादळ सुरु आहे. आजोबा , आई चे वडील आता हयात नाहीत :(
बालपणी च्या सगळ्या आठवणी एक नंतर एक डोळ्या समोआ येऊ लागल्या,,, आणि खुप एकत्र आल्या कि डोळ्यात पाणी साठून येत ,,
UK त आल्यानंतर ३ दा भारतात गेले होते… पण ३ न्ही वेळ जमला नाही  नांदेड ला जायला
माझ्या पेक्षा पिल्लू ने त्यांना पहिला नाही  आणि त्यांनी पिल्लू ला  पहिला नहीं ह्याची खंत मनाला खाते,,

ह्या सगळ्या आठवणी तेव्हा  मनात का येत नाहीत जेंवा  आपण  जाऊन  भेटू शकत असतो पण तेव्हा  काही ना  काही कारण  देऊन आणि जमला नहीं वगेरे मनाला खोट्या गोष्टी सांगत राहतो,,

टेक इट फॉर ग्रांटेड घेतो,,,, जमेल तेव्हा  ती गोष्ट करत नाही ,,
वेग वेगळ्या कारण ने  मी पिल्लू चा  लाम्ब चा प्रवास  घडवला नहि,,,, आयुष्यात धैर्याने पुढे नहीं गेलो तर आपल्या ओंजळीत फक्त regrets राहतात,,, आणि काही गोष्टी सुधरवता ही येत नाहीत,,,

कुठे तरी वाचल होत मधे,,,,
We always regret for not doing something than doing something wrong..
SO true...

पर्वा आशा भोसले ची मुलाखत रेडियो वॉर ऐकली,,,, त्यांच्या यशा मागचा रहस्य काय अस विचारला त्यांना,
त्या म्हणाल्या माझा कृष्ण म्हणतो,,, मागच्या चुकांच दुःख मानु नका आणि उद्या ची काळजी करू नका,,आज मधे जगा,,
always be possitive.... "Ho jayega"

मनात २ गोष्टी एका च वेळेस आल्या,,,,
कूठ ल्याच गोष्टी चा विचार न करता मी जायला हव होता,,,,पण आता दुख न करता हे शिकायला हवा की कुठलीही गोष्ट उद्या वर ढकलू नका ,,,,

Dont take it for granted :-)

देव बाप्पा माझ्या आजोबा ना  शांति देवो :-)




Saturday, March 13, 2010

उन्हाळा

आज  अचानक पुण्याची दरारून आठवण येतेय . सध्या उन्हाळा सुरु झाला असेल ..सगळी लोक ह्या वर्षीचा उन्हाळा किती जास्त आहे मागच्या उन्हाळ्या पेक्षा हे  discuss  करत असणार . लवकरच होणारी आंब्यांची  सुरुवात..शहळ्या च  पाणी ..सगळ्यांच्या घरी पन्हे , आंबील .. किती छान ..तापत्या उन्हा नंतर येणारी तांबडी संध्याकाळ.. पेप्सीकोले .. बर्फाचे गोळे .. कोकणातल्या ट्रीप . . .. उन्हाळा सुरु झाला कि tv वर येणाऱ्या ice creame च्या जाहिराती ..वाडीलाल .. वाल्स ..रसना :)   चैत्रा च हळदी कुंकू.. आंबे डाळ ..  उन्हाळ्याची सुट्टी ..वेग वेगळ्या flavours ची सरबत .. 
कि म येणार आंबे... माझा हापूस .. मग मात्र  चंगळ च  चंगळ.. ..
आई सगळी उन्हाळ्याची काम काढायची....साबुदाण्याचे पापड, बटाटा चिप्स .बटाट्याचा कीस ..लोणची.. मूग वडे, सांडगे .. आणि काय काय .अजूनही करते च थोडा फार ..
हळू हळू ह्या सगळ्या गोष्टी आमच्या generation मध्ये च गायब होणार . . 
आपल्या कडच्या  प्रत्येक ऋतू वर लिहायला सांगितला तर ..किती वेगवेगळ्या गोष्टी मनात येतील.. 
पुलावर..कट्ट्यावर  च भेटणं  .. मटकी भेळ.. पाणी पुरी ..हल्ली मी ऐकलं मुंबईत ठाण्यात एका ठिकाणी बिसलेरी water वापरून केलेलं पाणी ..त्याची पाणी पुरी असते  ..सही आहे..:)
इंग्लंड मध्ये राहिल्यावर सर्वात पहिली गोष्ट जिचं महत्व पटत ..ती म्हणजे उन . :)  सध्या इकडे हि हळू हळू उन्हाळा सुरु होतोय.. उन्ह पहिला कि कोण आनंद होतो... आणि इकडे पावसाचा मस्त  आवाज येत  नाही...

काल इकडे एका south इंडिअन restaurent मध्ये  गेलो होतो... सगळा काही आपल्या सारखाच असता taste wise ..पण तरीही आम्हाला व्याडेश्वर (F .C .रोड )मध्ये च खावंसं वाटलं :)

ह्याला च कूप मंडूक म्हणतात का? कि मातीची ओढ म्हणतात ?
A man travels whole world in search of  something and returns home to find it :)  
Discovery वर  वाचला  होत  ..author आठवत  नाही  .

तुमच्या करता उन्हाळा म्हंटल  कि काय आठवत ..
काय काय मनात येत ते आज च लिहा ..diary त ...  
सगळ्या मंडळींनी घरातल्या... आजी आजोबा आई बाबा ..
आणि आपापल्या आठवणी आपल्या मुलांना आणि 
सर्वांना सांगा ..
मला हि पाठवायला विसरू नका