साहित्य :
१ वाटी उडदाची दाळ
हिरव्या मिरच्या बारीक़ चिरलेल्या
अधरक बारीक़ किसलेला
तळण्या करता तेल
जीरे पुड
कोथिम्बिर ( optional) बारीक़ चिरलेली
पाणी
मीठ
कृती :
- उडदाची दाळ जवळ पास २ ते अडीच तास भिजत ठेवावी
- नंतर मिक्सर मधून वाटुन घ्यावी
- वाटलेली दाळ जास्त वेळ ठेवल्यास तेल जास्त ओढल्या जाते , म्हणुन जेव्ह्ना वडे करावयाचे असतील तेव्ह्नाच वाटुन घेणे उत्तम
- वाटल्या वर हाताने चांगले फेटून घेणे
- वडे तळून घ्यावेत
- लहान भांड्यात पाणी गरम करावयास ठेवावे
- पाणी कोमट झाले की त्यात मीठ घालावे व नंतर त्या पाण्यात वडे घालावेत
- १ ते २ मिनिटे ठेवावेत व नंतर हातात धरून पिळून काढावेत
- दही छान घुसळुन घ्यावे व त्यात १ -२ चिमुट साखर घालावी( दह्याचा आम्बट पणा बघून घालावी ) , किसलेला अद्रक आणि बारीक़ चिरलेली मिर्ची एकत्र वाटावी व दह्यात घालावी ( चावी प्रमाणे मिर्ची घालणे )
- दही परत चांगले मिसळुन घ्यावे व वाड्यानवर घालावे
- वरून जीरे पूड थोडेस तिखट अस हाताने घालावे
- घरी असल्यास चिंच गुळाचा सॉस ही घालावा
- हवी असल्यास कोथिम्बिर बारीक़ चिरलेली घालावी .
- दही बनवताना मीठ घालू नए
- तळून झाल्या वर ज्या वेळेस वडे वाढायचे असतील त्या आधी कोमट पाण्यातून काढून घ्यावेत
1 comment:
Post a Comment