Sunday, July 27, 2008

उपवासाची बटाट्याची भाजी




बनवण्या करता वेळ : १५ मिनिटे


साहित्य :

३ ते ४ बटाटे
अर्धी वाटी दाण्याच कूट
२ ते ३ हिरव्या मिरच्या
जिर
चहाच्या चमच्या एवढी साखर
२ चमचे तूप
चवीनुसार मीठ

क्रृती :

  1. बटाटे कुकर मधे चांगले उकडून घ्यावेत
  2. मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत
  3. फोडणी करता तुप गरम करायला ठेवावे , चांगले तापल्यावर त्यात जिर , मिरच्यांचे तुकडे घालावेत
  4. बटाट्याचे तुकडे घालावेत
  5. १ / २ दा हलवल्यावर दाण्याच कूट , साखर , मीठ घालाव
  6. १ वाफ येऊ द्यावी
  7. गरम गरम भाजी , (उपवासाच्या )लिम्बाच्या लोणच्या सोबत किंवा दह्या सोबतहि छान लागते

टीप : बटाटे कधी कधी जास्तच शिजले गेले असतील तर , भाजी बनाव तानाची जी वाफ सांगितली आहे ती देऊ नए .

No comments: