Wednesday, July 9, 2008

Akki Roti/ अक्की रोटी ( तांदळाचे थालीपीठ )

Akki Roti:

अक्की म्हणजे कन्नड़ भाषेत तांदुळ। म्हणुन अक्की रोटी म्हणजे आपण त्याला तांदळाचे थालीपीठ म्हणू शकतो





साहित्य :
२ कप तांदळाचे पीठ
कोथिम्बिर बारीक़ चिरलेली ( १ ते २ मीडियम साइज़ च्या जुड्या )
७ ते ८ मिरच्या बारीक़ चिरलेल्या ( चवीनुसार कमी किंवा जास्त )
४ ते ५ कांदे बारीक़ चिरलेले
शेपू बारीक़ चिरलेला ( साधारण १ जुड़ी )
कड़ी पत्ता बारीक़ चिरलेला
जीरा
मीठ चवीनुसार
पाणी

कृती:

  • तांदुळाच्या पीठात चिरलेला कंदा, कोथिम्बिर,कड़ी पत्ता, हिरव्या मिरच्या, जीरे, मीठ, चिरलेला शेपू घालावा व त्यात मावेल इतपत च पाणी घालून चांगले मळावे
  • पीठ, ना जास्त पातळ ना घट्ट असे मळावे
  • तव्यावर थालीपीठा प्रमाणे लावावे
  • कड़े ने तेल थोड़े तेल सोडा
  • रंग बदल्ल्या वर उलथवावे
  • दोन्ही बाजूंनी भाजावे ।
  • गरम गरम वाढावे
  • ह्या सोबत शेंग दाण्याची चटणी छान लागते
शेपू अगदी घातलाच पाहिजे अस नाहीये पण त्याने छान फ्लेवर येतो पण कुणाला आवडत नसल्यास घालू नय्ये

No comments: